हरियाणामध्ये ‘पद्मावत’ चित्रपटाला लाल कंदील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
हरियाणा: हरियाणा राज्यात पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही अशी माहिती नुकतीच हरियाणा सरकारने जाहीर केली आहे. आज हरियाणामध्ये मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित होईल मात्र हरियाणामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
 
आज हरियाणा सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान यानंतर आता हरियाणामध्ये देखील या चित्रपटावर निर्बंध लादण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित होण्यावर वाद सुरु आहेत.
 
दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचा सगळ्यात वादग्रस्त चित्रपट ‘पद्मावत’ हा ठरला आहे. ‘पद्मावती’ हे नाव बदलवून या चित्रपटाचे ‘पद्मावत’ नाव ठेवण्यात आले तसेच ‘घुमर’ गाणे देखील या चित्रपटातून वगळण्यात आले, मात्र इतके सगळे करून देखील या चित्रपटाचा मार्ग मोकळा झालेला नाही.
 
‘पद्मावत’ हा चित्रपट २५ जानेवारीला संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. मात्र काही प्रमुख राज्य सोडले तर सगळीकडे हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@