‘कार्टोसॅट-२’ उपग्रहाने पाठवले पहिले छायाचित्र
 महा एमटीबी  16-Jan-2018
 
 
 
 
 
भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने १२ जानेवारीला पीएसएलव्ही-सी ४० या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने '१००' व्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. यामध्ये भारताचा ‘कार्टोसॅट-२’ हा उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आला होता. आता याच उपग्रहाने भारताचे पहिले वाहिले छायाचित्र पाठविले आहे.
 
 
 
 
इंदोर शहरातील होळकर मैदानाचे छायाचित्र तसेच तेथील आजुबाजूचा परिसर याचे छायाचित्र या उपग्रहाने घेतले आहे. हे छायाचित्र ‘इस्रो’ने त्यांच्या साईटवरून आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. या प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात ‘कार्टोसॅट-२’ ला त्याच्या योग्य कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात आले होते. 
 
 
 
 
त्यामुळे इतक्या जलद गतीने या उपग्रहाने हे छायाचित्र पृथ्वीपर्यंत पोहोचविले आहे. १२ जानेवारीला ९ वाजून २५ मिनिटांनी इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ४०चे प्रक्षेपण केले. यावेळी पीएसएलव्हीसह भारत, कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, ब्रिटेन आणि अमेरिका या देशांचे एकूण ३१ उपग्रह अंतराळात सोडण्यात आले होते, यामध्ये भारताचे तीन उपग्रह होते.