म्हणून लातूरमध्ये बाहेरून टँकर मागवण्याची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 
लातूर : लातूरमध्ये गेल्या वर्षात बाहेरून पाणी पुरवठा करावा लागला होता. राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने रेल्वेच्या सहाय्याने लातूरमध्ये पाणी पोहीचाविण्याची आवश्यकता भासली होती, मात्र आता तशी अवस्था नाही. जलयुक्त शिवारामुळे लातूर पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
दुष्काळग्रस्त भागात एकही टँकर लागत नाही, यातच जलयुक्त शिवाराचे यश दडलेले आहे, असे देखील त्यांनी सांगितले. मराठवाडा दुष्काळातून मुक्त झालेला आहे, यावर वरुण देवतेचे कृपा आहेच मात्र जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे हे शक्य होऊ शकले आहे.
 
राज्यभरात जलयुक्तशिवार योजनेचा मोठ्याप्रमाणात बोलबाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी याद्वारे राज्य सरकार प्रयत्नशील असते. लातूर हे त्याचे एक उदाहरण आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@