सेवाभाव आपल्या संस्कृतीचा एक भाग: नरेंद्र मोदी
 महा एमटीबी  12-Jan-2018
 
 
 
 
 
 
कर्नाटक: सेवाभाव हा आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज कर्नाटक येथे युवक दिवस समारोहात तसेच सर्वधर्म सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. आपल्या देशामध्ये सेवाभाव आणि संस्कृतीला खूप महत्वाचे स्थान दिले जाते. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग या दोन गोष्टीला मानले जाते असे ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सेवाभाव आपल्या समाजाला एक वेगळ्या आणि उच्च स्थरावर नेवून स्थापित करत आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील नेहमी बंधुभाव आणि सामाजिक सेवा याला जास्त महत्व दिले. त्यामुळे आपण देखील समाजाचा विचार करून आपल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.