नॉटआउट '१००'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |

पीएसएलव्ही-सी ४० चे यशस्वी प्रक्षेपण

भारताचा शंभरावा उपग्रह अंतराळत स्थापन




श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज आणखीन एक नवा इतिहास रचला असून पीएसएलव्ही-सी ४० या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने इस्रोने आपला '१००' व्या उपग्रहाचे देखील यशस्वी प्रक्षेपण केले आहे. याच बरोबर अन्य देशांचे आणखीन ३० उपग्रहांचे देखील इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केले असून त्यांना योग्य त्याकक्षेमध्ये स्थापन केले आहे.

आज सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ४०चे प्रक्षेपण केले. यावेळी पीएसएलव्हीसह भारत, कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, ब्रिटेन आणि अमेरिका या देशांचे एकूण ३१ उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. यामध्ये भारताचे तीन उपग्रह होते. यामध्ये भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कार्टोसॅट-२ या उपग्रहाचे देखील प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात कार्टोसॅट-२ ला त्याच्या योग्य कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात आले.



इस्रोच्या या यशानंतर या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच इस्रोच्या या कामगिरीमुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्रोचे या कामगिरीसाठी कौतूक केले असून वर्षाच्या सुरुवातीला देशाला मिळालेले हे यश अत्यंत महत्तवाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या उपग्रहांचा भारतातील सर्व जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे, असे देखील मोदींनी म्हटले आहे. 





@@AUTHORINFO_V1@@