देशभरात युवा दिनाचा जल्लोष
 महा एमटीबी  12-Jan-2018


कोलकत्ता : स्वामी विवेकानंद यांच्या जन्मजयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येणारा 'युवा दिन' आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरातील शाळा- महाविद्यालय, विवेकानंद केंद्र तसेच विविध सामाजिक संस्थांकडून 'युवा दिना'निमित्त तरुणांसाठी विविध कार्यक्रकांचे आयोजन करण्यात आले आहे.

रामकृष्ण मिशनच्या देशभरातील सर्व आश्रम आणि मठांमध्ये आज या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील तरुण देखील मोठ्या संख्याने युवा दिनानिमित्त समाजसेवी कार्यांमध्ये सहभागी होत आहेत. कोलकत्ता येथे असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या निवासस्थानी देखील स्वामींच्या १५५ या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. युवा दिनानिमित्त कोलकत्तासह देशभरातून नागरिक आज सकाळपासून याठिकाणी येत असून विवेकानंद यांना अभिवादन करत आहेत.
स्वामी विवेकांनद यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये तरुणांना देशकार्य आणि समाजकार्य करण्यासाठी प्रेरित केले होते. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 'राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. या दिवशी अनेक तरुण मोठ्या संख्याने सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होतात.