अमेरिका आणि इस्राइल विरोधात जिहाद पुकारा : हाफिज सईद
 महा एमटीबी  12-Jan-2018


इस्लामाबाद : अमेरिका हा सध्या इस्राइल अजेंडा पुढे करत आहे. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या पराभवाचा राग अमेरिका तो पाकिस्तानवर काढत असून पाकिस्तानला तो आपला गुलाम करू पाहत आहे. त्यामुळे सर्व मुस्लीम देशांनी एकत्र येऊन अमेरिका आणि इस्राइलविरोधात जिहाद पुकारला पाहिजे' असे आवाहन मुंबई हल्लाच्या सूत्रधार हाफिज सईद याने केली आहे. इस्लामाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये तो बोलत होता.
अमेरिकेच्या नव्या धोरणांवर आणि वक्तव्यांवर टीका करत, अमेरिका जे काही करत आहे ते इस्राईलच्या सांगण्यावरून करत असून अफगाणिस्तानमध्ये झालेल्या पराभवाचा राग अमेरिका पाकिस्तानवर काढू पाहत आहे. त्यामुळे सर्व मुस्लीम देशांनी एकत्र येऊन अमेरिका आणि इस्राइलविरोधात जिहाद पुकारला पाहिजे' असे हाफिजने म्हटले.

आपल्या भाषणादरम्यान त्याने पाकिस्तान सरकारवर देखील टीका केली. पाकिस्तानमध्ये खऱ्या इस्लाम धर्माची स्थापना झाली पाहिजे, परंतु पाकिस्तान सरकार हे सध्या इस्लाम विरोधी भूमिका घेत असून पाकिस्तानमध्ये इस्लामची स्थापना करण्यासाठी सर्व पाकिस्तान नागरिकांनी एकत्र आले पाहिजे' अशी कोल्हेकुई मुंबई हल्लाच्या सूत्रधार हाफिज सईद याने केली आहे. इस्लामाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये तो बोलत होता.
'पाकिस्तान सरकार हे मोहम्मद पैगंबराचा संदेश पसरवण्याऐवजी तो नष्ट करण्याचा प्रयत्न ते करत आहे. त्यामुळे इस्लामच्या रक्षणासाठी सर्व मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे' असे हाफिजने म्हटले आहे. तसेच नेहमीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत, काश्मीरमधील जनतेच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान सरकार कसल्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही, असा आरोप त्याने केला.