शहापूरच्या वैभव हिलमची भारतीय संघात निवड
 महा एमटीबी  12-Jan-2018

१९ वर्षाखालील वर्ल्डकप संघात समावेश

 
 
 
शहापूर : शहापूर तालुक्यातील इयत्ता अकरावीत शिकणार्‍या वैभव विजय हिलमया विद्यार्थ्याची आयसीसीच्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धा बँकॉक येथे दि. १९ जानेवारीपासून होणार आहेत. भारतीय संघात स्थान मिळाल्याने आपली स्वप्नपूर्ती झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
 
वैभव हा मूळचा तालुक्यातील लेनाड-गोकुळगांवचा रहिवासी असून सध्या तो शहापूर जवळील वाफे येथे निवासी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण शहापूरातील महिला मंडळ शाळेत झाले असून ५ वी ते ११ चे शिक्षण त्याने शहापूरातील ग.वि.खाडे विद्यालयात घेत आहे. वैभवचा आर्थिक भार वडील उचलत असून कुटुंबातील ते एकमेव कमवते आहेत.
 
 
आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून नियमानुसार वैभवला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच ही मदत प्राप्त होईल. -अरूणकुमार जाधव