इंदु मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नेमणूक
 महा एमटीबी  12-Jan-2018
 
 
 
 
 
 
 
दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम करणाऱ्या इंदु मल्होत्रा यांची आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या मंडळाने घेतला आहे.
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील म्हणून काम करणाऱ्या इंदु मल्होत्रा या भारताच्या पहिल्या महिला वकील आहे ज्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या वकील पदावरून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नेमणूक करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या मंडळाने घेतला आहे. सध्याच्या घडीला न्यायाधीश आर. भानुमती या सर्वोच्च न्यायालयाच्या एकुलत्या एक महिला न्यायधीश आहेत.
 
 
२००७ मध्ये वरिष्ठ वकीलाचा दर्जा संपादन करणाऱ्या इंदु मल्होत्रा या देशाच्या पहिल्या महिला असेल ज्यांची नियुक्ती वकील पदावरून थेट न्यायाधीश पदी करण्यात आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इंदु मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या सातव्या महिला न्यायाधीश म्हणून ठरणार आहेत.