युवकांना भेडसावतेय बेरोजगारीची समस्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 
 
१२ जानेवारी हा ‘युवा दिवस’. आपल्या देशातील ज्या थोड्या लोकांनी युवकांना भारावून टाकण्याची किमया साधली त्यातील एक असलेल्या स्वामी ‘विवेकानंद’ यांची आज जयंती त्यानिमित्ताने मनात भारतातील युवकांची आजची स्थिती काय आहे? यावर विचार सुरु होतो.
 
एका सर्वेक्षणानुसार भारतात ६० टक्के जनता २५ ते ४० वयोगटातील आहे. म्हणजेच भारत हे जगातील ‘युवा राष्ट्र’ म्हणून गणले जाते. साधारणपणे युवा म्हणजे ऊर्जा, ऊर्जेचा स्त्रोत. ह्या उर्जेला योग्य दिशा अथवा मार्ग मिळाला नाही तर त्याचा स्फोट होतो. अथवा ती वाया जाते. मग भारतात ह्या उर्जेचा योग्य वापर होतो आहे का? तो स्त्रोत वाया जात आहे का? नाईलाजाने म्हणावे लागेल की हा स्त्रोत वाया जात आहे. या ऊर्जेचा योग्य वापर होताना दिसत नाहीये. ह्या परिस्थितीला अनेक कारणे आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणे म्हणजे महागडे शिक्षण, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि देशातील अस्थिर, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती.
 
 
आजच्या शिक्षण व्यवस्थेत भारतात निश्‍चितच अनेक नामवंत
शिक्षणसंस्था आहेत. पण त्यांची वाढ एकांगी झालेली आहे. समाजातल्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण पोहोचले आहे. परंतु असे होताना दिसत नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणाईला कौशल्यावर आधारित अथवा मूलभूत शिक्षणाची म्हणजेच डज्ञळश्रश्र लरीशव आणि लरीीशी ेीळशपींशव शिक्षणाची गरज आहे. परंतु असे शिक्षण समाजातील प्रत्येक घटकाला मिळेलच ह्यासाठी आपली शिक्षण यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अशा परिस्थितीतून कर्ज काढून अथवा अन्य मार्गाने शिक्षण पूर्ण केल्यावर लगेच रोजगार अथवा नोकरी मिळेलच ही शाश्‍वती नाही. तसेच घेतलेले शिक्षण आणि उपलब्ध रोजगार यांचा मेळ बसत नाही. साहाजिकच नोकरीसाठी विदेशात जाण्याचा कल निर्माण होतो. परंतु आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता त्यातही फारसे अनुकूल वातावरण दिसत नाहीये. ग्रामीण भागात युवावर्ग शेतीसाठी फारसा उत्सुक दिसत नाही. कारण शेती व्यवसायासाठी शासनाकडून ठोस कोणतेही अभय नाही. शेतीप्रधान देशात शेतीसाठी अनुकूल वातावरण असू नये अशा विरोधाभासाचा अनुभव भारतीय सध्या घेत आहेत. शिक्षण आणि बेरोजगारी या समस्या अधिकाधिक तीव्र होतात. त्या भ्रष्टाचाराला जर मुळापासून नष्ट करायचा असेल तर गरज आहे ती आदर्शवादाची, वर्गविरहित समाजरचनेची.
 

 
 
 
स्वामी विवेकानंदांसह सर्व महापुरुषांना अपेक्षित असणारा ‘युवक’ आज तरी कुठे दिसत नाही. मागच्या पिढीपेक्षा आजची पिढी दिसायला तरतरीत दिसते ते मोबाईल, संगणक, चारचाकी वाहन लिलया चालवतात, अवघड परीक्षा सहज देतात पण त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि पूर्णत्वाचा अभाव वाटतो याचे कारण भूतकाळ समजून न घेता त्यांना भविष्य घडवायचे आहे. त्यांच्या आकाक्षांना ऐहिकतेचे गहिरे रंग आहेत. त्याला सूक्ष्म, तरल आंतरिक प्रेरणांचा स्पर्श नाही. देश स्वातंत्र्य, समता व्यक्तिमत्त्वांचा आदर अशी मार्गदर्शके नाहीत. स्पर्धा परीक्षा द्याव्या, अधिकारी व्हावे, इंजिनिअर होवून विदेशात स्थायिक व्हावे, जमल्यास नाटक-सिनेमात जावे, अत्यंत वेगाने प्रसिध्दीस यावे, श्रीमंत व्हावे आणि सुखी व्हावे हे तत्त्वज्ञान सध्या युवकांमध्ये रुजलेले आहे. त्यांच्यात निर्भयता व स्वतंत्रता हे गुण आहेत पण एखाद्या कामाला जुंपून घ्यावे, समर्पित व्हावे हे त्यांच्या स्वभावात नाही. असे म्हटले तरीसुद्धा ही समाजाच्या जडणघडणीतील एक पायरी आहे. यातूनही युवा वगर्र् बाहेर पडणार आहे. त्यासाठी त्याला मागची व पुढची म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळाची सांगड घालायची आहे. ती घालत असतांनाच त्याला अशा महामानवांच्या आदर्शवत जीवनांचा आधार घ्यावा लागेल आणि तो ते घेतील अशी सदिच्छा. तसेच परिस्थिती माणूस घडवते हा विश्‍वास.
 
 
डॉ.तेजोमयी भालेराव
जळगाव 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@