नशीबवान’चा फर्स्ट लुक रिलीज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
विविध राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे आता चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ‘नशीबवान’ असे या चित्रपटाचे नांव असून या चित्रपटाचा आज फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला, या लक्षवेधी पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
 
चित्रपटाच्या फर्स्ट लुकवरून या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम असल्याचे दिसते. फ्लाईंग गॉड फिल्मस् प्रस्तुत ‘नशीबवान’ या चित्रपटाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड, महेंद्र गंगाधर पाटील असून सह निर्मता प्रशांत विजय मयेकर आहेत. “”नशीबवान’ या चित्रपटाची ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) च्या स्पर्धा विभागात निवड झाली आहे.
 
‘नशीबवान’च्या दिग्दर्शनासह कथा - पटकथा - संवाद आणि सिनेमॅटोग्राफी अशी जबाबदारी अमोल वसंत गोळे यांनी सांभाळली आहे. गोळे यांची निर्मिती असलेल्या ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार, पिफ (२०१६) मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला पिफ (२०१५)मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि गोळे यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेल्या 'हा भारत माझा' ला पिफ मध्ये संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@