रायगड जिल्हा सहाय्यक सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. राजेंद्र येरूणकर यांची नियुक्ती
 महा एमटीबी  12-Jan-2018
 
 

 
कर्जत : खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. राजेंद्र येरूणकर यांची रायगड जिल्हा सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत न्यायालयामधील वकील संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
 
कर्जत न्यायालयाच्या बार रूममध्ये कर्जतचे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर यांनी वकील राजेंद्र येरूणकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी वकील अ‍ॅड. प्रमोद सुर्वे, अ‍ॅड. प्रविण खडे, अ‍ॅड. महेश घारे, अ‍ॅड. गितेश सावंत, अ‍ॅड.किशोर देशमुख, अ‍ॅड. महेश थोरवे, अ‍ॅड. रुपेश पाटील, अ‍ॅड. नितीन क्षीरसागर, अ‍ॅड. सुमित कराळे, अ‍ॅड. भारत सावंत, अ‍ॅड. अजय भोईर, अ‍ॅड. मोतीलाल ओसवाल आदी उपस्थित होते.
 
प्रारंभी अ‍ॅड. महेश घारे यांनी प्रास्ताविक केले. शासनाने अ‍ॅड. येरूणकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची रायगड जिल्हा सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. असे अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी असल्याने मी चांगले काम करणार आहे, असे अ‍ॅड. राजेंद्र येरूणकर आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले. अ‍ॅड. प्रमोद सुर्वे यांनी आभार मानले.