तुम्ही जे काम करता त्यानुसार देशाचे भविष्य ठरते: नरेंद्र मोदी
 महा एमटीबी  12-Jan-2018
 
 
 
 
 
उत्तर प्रदेश: देशातील तरुण आज जे काम करतात त्यानुसार देशाचे भविष्य ठरणार आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे २२ व्या राष्ट्रीय युवा संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करतांना नरेंद्र मोदी बोलत होते यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.
 
 
 
 
आजचे तरुण देशाचे भविष्य निश्चित करू शकतात त्यामुळे आजच्या तरुणांनी देशासाठी जे चांगले संकल्प केले आहे त्याचे फळ भविष्यात आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आजचे तरुण देशाच्या भविष्याची वाटचाल तयार करू शकतात असा सल्ला देखील त्यांनी यावेळी तरुणांना दिला.
 
 
 
गुरुकडून तुम्ही केवळ शिक्षण घेवून उपयोग नाही तर त्या शिक्षणाचा तुम्ही तुमच्यासाठी आणि देशासाठी कसा वापर करता हे जास्त महत्वाचे आहे, आणि त्यामुळे तुम्ही यशस्वी झाला की अयशस्वी झालात याची प्रचीती लोकांना येते असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी केंद्रीय खेळ राज्य मंत्री राज्यवर्धन राठोड उपस्थित असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.
 
यावेळी राज्यवर्धन राठोड यांनी तरुणांना संबोधित केले तसेच त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.