सहवागने दिल्या द्रविडला खास अंदाजमध्ये शुभेच्छा
 महा एमटीबी  11-Jan-2018

 
मुंबई :  भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसह त्याच्या खास शैलीसाठी देखील प्रसिद्ध आहे. समाज माध्यमांवर सतत वावर असणाऱ्या सहवागने नेहमीच आपल्या खास शैलीत इतर क्रिकेटपटूंना किंवा कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमीप्रमाणे यावेळी देखील त्याने आपल्या विशिष्ट शैलीत राहुल द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. आज राहुल द्रविडचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने एका वेगळ्या पद्धतीने वीरुने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
त्याने चीनच्या 'गेर्ट वॉल ऑफ चायना' चा आणि त्यानंतर गाडीवर बसलेल्या स्वत: आणि राहुल द्रविडचा फोटो टाकत तो लिहीतो की, "पहिल्या फोटोतील भिंत दणकट आहे का नाही माहीत नाही मात्र दुसऱ्या फोटोमधील आमची जोडी आणि गाडी चालवणारा नक्कीच दणकट आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
 
हा फोटो खूप जुना आहे, तसेच यामध्ये सहवाग आणि राहुल हे देखील खूप तरुण दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांनी हा फोटो पाहून अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.