विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार जाहिर
 महा एमटीबी  11-Jan-2018
 
 
 
 
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभेची निवडणुकीचा शंकनाद झाला असून ११ रोजी अर्ज माघारी नंतर निवडणुकिचे चित्र स्पष्ट झाले. विद्यापीठ विकास मंचची उमेदवारांची यादी विद्यापीठ विकास मंचचे विभाग प्रमुख दिपक पाटील यांनी घोषीत केली. विद्यापीठ विकास मंचचे विभाग प्रमुख दिपक पाटील यांच्या नेतृत्वात मंच ही निवडणुक लढवत आहे.
 
 
 
या निवडणुकित खुल्या प्रवर्गातुन दिपक बंडु पाटील, अमोल साहेबरावर मराठे, यशवंत येवलेकर, दिनेश नाईक, निखील वायकोळे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातुन अमोल नाना पाटील, अनुसुचित जाती प्रवर्गातुन दिनेश उत्तम खरात, एनटी प्रवर्गातुन विवेक दिलीप लोहार, महिला प्रवर्गातुन मनिषा यशवंत चौधरी(खडके), अनुसुचित जमाती प्रवर्गातुन नितीन लिलाधर ठाकुर यांची उमेदवारी दिपक पाटील यांनी जाहिर केली. या वेळी प्रचार प्रमुख निलेश झोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
 
आजपर्यंत विद्यापीठ विकास मंचने विद्यापीठ विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य केले आहे. त्या कामांवरच यशाची खात्री दिपक पाटील आणि निलेश झोपे यांनी व्यक्त केली आहे.