त्या सहा नगरसेवकांचा आज फ़ैसला?
 महा एमटीबी  11-Jan-2018
 
 
 
 
मुंबई : ‘मनसे’तून बाहेर पडलेले ‘सहा’ नगरसेवकाचा आज फ़ैसाला होण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सहा नगरसेवकांच्या या निर्णयाविरोधात मनसेने कोकण भागीय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. त्यावर आज कोकणच्या विभागीय आयुक्तांनी आज मुबंईत सुनावणी घेतली. अ‍ॅड. अक्षय काशीद यांनी ‘मनसे’ची आणि आमदार अनिल परब यांनी शिवसेनेची बाजू आयुक्तांसमोर मांडली. दरम्यान, या सुनावणीनंतर येत्या दोन दिवसांमध्ये या सुनावणीचा निकाल कोकण विभागीय आयुक्तांकडून अपेक्षीत आहे, असे सांगण्यात येते पण शुक्रवारी (ता. १२) होणा-या महापालिकेच्या महासभेत आयुक्तांकडून पालिकेला आलेला निर्णय जाहीर होण्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

 
 
मनसेला कायद्याचे दार उघडे
 
नगरसेवकांना शिवसेनेत विलिन करण्याबाबतचे पत्र शिवसेनेने कोकण विभागीय आयुक्तांना यापूर्वी दिले होते. या नगरसेवकांच्या गट स्थापनेची मागणी आम्ही केली नियमात राहून मागणी केली आहे. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असून, तीन अपक्ष आणि मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले सहा अशी एकूण ९३ नगरसेवक संख्या आहे. त्याचा तपशील गुरुवारी आयुक्तांकडे ठेवला असून ‘शिवसेनेत आलेल्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी मनसेला कायद्याचे दार उघडे आहे, आम्ही त्यालाही तयार आहोत.
- अ‍ॅड. आ. अनिल परब, वकील शिवसेना
 
 
तर नगरसेवक पद सोडावे लागेल
 
हे सहा नगरसेवक ‘मनसे’च्या चिन्हावर निवडून आले आहेत त्यांना शिवसेनेत प्रवेश करायचा असल्यास त्यांना नगरसेवक पद सोडावे लागेल. त्यासाठी काही दाखले आम्ही कोकण विभागीय आयुक्तांसामोर ठेवले आहेत, असे मनसेकडून सांगण्यात आले.
- अ‍ॅड. अक्षय काशीद, मनसेचे वकील