अल्पसंख्यांकांसाठी लढणाऱ्या काही व्यक्ती व संस्था
 महा एमटीबी  11-Jan-2018
('बांगलादेशातील अल्पसंख्यांक' या अक्षय जोग यांच्या सदरातील हा ९ वा लेख )
 
 
 
डॉ. रिचर्ड बेन्कीन
डॉ. रिचर्ड बेन्कीन हे अमेरिकन ज्यू, मानवधिकार कार्यकर्ते व लेखक आहेत; तसेच ‘Interfaith Strength’ व ‘Forcefield’चे सहसंस्थापक आहेत. त्यांनी अमेरिकन कांग्रेससमोर बांगलादेशातील हिंदूंचे हत्याकांड व तेथील हिंदूंसाठी अन्यायकारक 'Vested Property Act' ह्या गोष्टी मांडल्या आहेत. डॉ.बेन्कीन बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्याकांडाची माहिती जगाला कळण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी जनजागृती करत आहेत व दक्षिण आशियातील आपल्या सहबांधवांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन हिंदूंचे संघटन करत आहेत.

सलाहउद्दीन शोएब चौधरी
सलाहउद्दीन शोएब चौधरी हे बांगलादेशातील वृत्तपत्र 'Weekly Blitz' चे संपादक, स्थानिक साप्ताहिक ‘जामाजमात’ चे मुख्य संपादक व बांगलादेशातील पहिली खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी 'A-21' चे संस्थापक आहेत. ते त्यांच्या जिहादविरोधी विचारांसाठी ओळखले जातात. देशातील वाढता इस्लामी कट्टरतावाद, मदरस्यांच्या माध्यमातून पसरवली जाणारी व्देषभावना ह्या गोष्टी उघड केल्यामुळे तसेच ढाका-जेरूसलेमसंबंध व इस्राएलला मान्यता देण्यासाठी व इस्राएलला भेट देण्यासाठी केलेले प्रयत्न, धार्मिक समानता व आंतरधर्मीय संवादाचा केलेला पुरस्कार ह्यामुळे चौधरी ह्यांना सरकारने २००३ मध्ये अटक करून १७ महिने छळ करण्यात आला होता.१

तुलसी गिबार्ड
अमेरिकन हाऊस ऑफ़ रिप्रेझेंटेटिव्हच्या पहिल्या हिंदू प्रतिनिधी ‘तुलसी गिबार्ड’ यांनी सोशल मिडियावर बांगलादेशातील धार्मिक अल्पसख्यांकांविरूध्द आवाज उठवणाऱ्या २८ वर्षीय नझिमुद्दीन समदच्या हत्येचा उल्लेख करून बांगलादेशातील नास्तिक, धर्मनिरपेक्ष, हिंदू, बौध्द, व अन्य धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधातील भेदभाव व हिंसक हल्ले थांबले पाहिजेत असे स्पष्टपणे सांगितले. इतकेच नव्हे गिबार्ड ह्यांनी अमेरिकन हाऊस ऑफ़ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये व्दिपक्षीय अमेरिकन निर्बंधसंबंधी ठराव मांडून बांगलादेशाला त्यांच्या देशातील असुरक्षित अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करण्यास सांगून हल्लेखोर गुन्हेगारांना न झालेली शिक्षा व धार्मिक स्वातंत्र्य ह्याविषयी चिंता व्यक्त केली होती.
 
 
बांगलादेशातील अल्पसंख्यांसाठी लढणाऱ्या काही संस्था
Campaign Against Atrocities on Minorities in Bangladesh (CAAMB)
Bangladesh Hindu Buddhist Christian Unity Council (Dhaka and Chittagong)
Bangladesh Hindu Buddhist Christian Unity Council (USA, UK & France)
Bangladesh Minority Forum
Bangladesh Minority Rights Alliance (Canada)
Bangladesh Minority Watch
 
 
बांग्लादेशातील प्रमुख इस्लामिक संघटना
Jammat-e-Islami (JI)
Islami Chhatra Shibir (ICS)
Islami Oikyo Jote (IOJ)
Harkat-ul-Jihad-al-Islami (HUJI)
Jihad Movement
Hizb ut-Tahrir (HT)
Jagrata Muslim Janata Bangladesh (JMJB)
Jama'atul Mujahideen Bangladesh (JMB)३
 
 
संदर्भ
१. Benkin, Dr. Richard; Bangladesh to Frame Sedition Charge against Salah Uddin Shoaib Choudhury, 19 May 2005, Asian Tribune
२. 30 July 2013, Economic Times
३. Saikia, Jaideep- Editor; Bangladesh: Treading the Taliban Trail, Vision Books Publication, 2006, पृष्ठ २३२ ते २३४