‘आयएनएसव्ही तारिणी’ फॉकलँड बेटावर पोहोचल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघालेली भारतीय नौदलाची तारिणी नौका फॉकलँड बेटावर पोहोचली आहे. सागरपरिक्रमेसाठी निघालेल्या या भारतीय महिला खलाशी प्रशांत महासागराच्या भयावह लाटांना उत्तर देत आता फॉकलँड बेटावर पोहोचल्या आहेत. बऱ्याच दिवसांचा प्रवास करत या महिला खलाशी बेटावर पोहोचल्या आहेत. 
 
 
 
 
या नौकेच्या कप्तान लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी असून अन्य सदस्यांमध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जमवाल, लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती, लेफ्टनंट कमांडर एस. विजयादेवी, लेफ्टनंट कमांडर बी. ऐश्वर्या आणि लेफ्टनंट कमांडर पायल गुप्ता यांचा समावेश आहे. 
 
 
 
 
प्रदक्षिणेदरम्यान या महिला खलाशी महासागरी हवामान, सागरी प्रवाह आणि सागरी प्रदूषणविषयक माहिती गोळा करीत आहेत. तसेच खोल समुद्रातल्या प्रदूषणाबाबतही नोंदी घेत आहेत. विश्रांती दरम्यान खलाशी स्थानिक नागरिकांशी विशेषत: मुलांशी संवाद साधतील तसेच धाडसी मोहिमांना, महासागर परिक्रमेला प्रोत्साहन देतील.
 
 
या मोहिमेद्वारे “मेक इन इंडिया” आणि भारतीय नारी शक्तीचे जागतिक स्तरावर नोंद घेतली जात आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@