यंदाच्या अर्थ संकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींची तज्ञांबरोबर बैठक
 महा एमटीबी  10-Jan-2018नवी दिल्ली : २०१८-१९ च्या यंदाच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञमंडळींशी चर्चा करणार आहेत. गेल्या वर्षभरामध्ये देशातील विविध क्षेत्रांमध्ये झालेले बदल आणि या क्षेत्रांसाठी यंदा अर्थसंकल्पात अपेक्षित असलेले नवे बदल व तरतुदीसंबंधी ते आज तज्ञांशी चर्चा करणार आहेत.

नीती आयोगाचे देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ, मान्यवर आणि विविध मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. कृषी, रोजगार, ग्रामीण विकास, नगर विकास, पायाभूत सुविधा, व्यापार, आरोग्य आणि मायक्रोइकोनॉमिक बॅलेंस हे विषय आजच्या या बैठकीमध्ये केंद्रस्थानी असणार असून या बैठकीला 'इकोनॉमिक पॉलिसी : द रोड अहेड' असे नाव देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने यंदा 'नव भारता'चा संकल्प केला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थ संकल्पामध्ये न्यू इंडियाच्या दृष्टीने अनेक नवे बदल अपेक्षित आहेत. याच बरोबर केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे काम देखील देशभरात सुरु आहे. यासंबंधी अनेक नवे बदल आजच्या या बैठकीत करण्यात येनात आहे.