कॅरेबियन सागरात ७.६ रिश्टर तीव्रतेच भूकंप
 महा एमटीबी  10-Jan-2018

मध्य अमेरिकेतील देशांना त्सुनामी लाटांचा इशारा

पनामा
: उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्ये असेलल्या कॅरेबियन सागरात आज झालेल्या ७.६ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे मध्य अमेरिकेतील सर्व देशांना त्सुनामी लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मध्य अमेरिकेत असलेले पनामा, कोस्टा रिका, निकाराग्वा, होन्डुरास, बेलीजसह दक्षिण अमेरिका खंडातील देशांना देखील त्सुनामीपासून सावध राहण्याचा इशारा वैज्ञानिकांकडून देण्यात आला आहे.

अमेरिकन स्थानिक वेळेनुसार रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. कॅरेबियन सागराच्या अगदी मध्यभागी भूकंपाचा केंद्रबिंदू असल्यामुळे कॅरेबियन सागरामध्ये सध्या प्रचंड मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे कॅरेबियन सागराच्या आसपासच्या सर्व देशांना आणि सागरातील बेटांना त्सुनामी लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर जाण्याचा देखील सल्ला प्रत्येक देशातील सरकारकडून देण्यात आला आहे.