पंतप्रधान मोदींचे संकेतस्थळ आता आसामी आणि मणिपुरी भाषेतही
 महा एमटीबी  01-Jan-2018
 
 
 
 
 
 
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे http://www.pmindia.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आता आसामी आणि मणिपुरी या प्रादशिक भाषांमध्येही बघायला मिळणार आहे. आजपासून या संकेतस्थळावर या भाषांची आवृत्ती सुरु करण्यात आली आहे.   
 
 
 
मोदींचे हे संकेतस्थळ आता इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त ११ प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजेच आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू या भाषेत उपलब्ध झाले आहे. 
 
 
 
हा उपक्रम जनतेपर्यंत पोहोचावा तसेच जनतेने स्वत:च्या प्रादेशिक भाषेमध्ये संवाद साधावा, या हेतूने हा प्रयोग करण्यात आला आहे. यातून देशाच्या सर्व भागातून विकासासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा आणि पंतप्रधानांशी संवाद साधणे हे सोपे जाणार आहे. 
 
 
 
या संकेतस्थळावर नरेंद्र मोदी घेत असलेले विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती, त्या कार्यक्रमांची छायाचित्र, ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) आणि मोदींची विविध ठिकाणी होणारी भाषणे यांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबरच मोदींबाबतची माहिती आणि मोदी सरकारने राबवलेल्या योजनांसंदर्भातील नोंदी ही या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. 
 
 
 
या संकेतस्थळावर डिजिटल इंडिया, लोकसभा, राज्यसभा, माय गव्हर्नमेंट, जीओआय वेब डिरेक्टरी, भारताचे राष्ट्रीय पोर्टल असे संकेतस्थळही संलग्न केली गेली आहेत.