सोनू आणि श्रेयाच्या  'मखमली' आवाजातलं 'हे'गाणं नक्की ऐका.. 
 महा त भा  07-Sep-2017


हिंदीतल्या नामवंत गायकांनी मराठी चित्रपटांमध्ये एखाद्या गाण्याला आवाज देणं हि गोष्ट आता तितकीशी नवी राहिली नाही. पण तरीही त्यातले वेगळेपण मात्र आजही टिकून आहे. सोनू निगम किंवा श्रेया घोषाल या हिंदी मधल्या आघाडीच्या गायकांनी आजपर्यंत मराठी गाण्यांसाठी आवाज दिला आहे. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या 'मखमली' आवाजात 'जिंदगी विराट' या चित्रपटातील एक गाणं गायलं आहे. 
 
Embeded Object
 
अंजेनेया साठ्ये यांनी निर्मित केलेल्या व सुमित संघमित्र याचे दिग्दर्शन असणाऱ्या आगामी 'जिंदगी विराट' या चित्रपटातील 'मखमली' याच 'टायटल'च एक गाणं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित झालाय. आता या गाण्याला सोनू आणि श्रेयाचा आवाज लाभल्याने ते जास्तच श्रवणीय वाटतय. मंदार चोळकर याने हे गाणं लिहिलं असून सूरज - धीरज यांनी त्याला संगीत दिलं आहे. 
 
Embeded Object
 
या चित्रपटात ओम भुतकर मुख्य भूमिकेत दिसत असून भाऊ कदम, अतुल परचुरे, किशोर कदम हे कलाकारही यामध्ये आहेत. कालच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. येत्या २९ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.