म्यानमारमधील ऐतिहासिक स्थळांना मोदींची भेट
 महा त भा  07-Sep-2017


नेपिडो (म्यानमार) : दोन दिवसीय म्यानमार दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मायदेशी परत येण्यासाठी निघाले आहेत. आपल्या या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये म्यानमार सरकार आणि जनतेनी केलेले स्वागत आणि पाहुणचारासाठी मोदींनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत, असे देखील मोदी म्हणाले आहेत.


म्यानमारच्या सल्लागार आंग सान सूकी यांच्याशी चर्चा केल्यानंतर तसेच दोन्ही देशांमधील करारांचे आदानप्रदान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज म्यानमारमधील काही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. म्यानमारमध्ये २५०० हजार वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या श्वेडागॉन पॅगोडा आणि तेथील बौद्ध मंदिराला मोदींनी आज भेट दिली. या ठिकाणी जाऊन त्यांनी बौद्ध परंपरेनुसार मंदिरात दर्शन घेतले तसेच प्रार्थना देखील केली. यानंतर मंदिरातील बौद्ध भिख्खूंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याच बरोबर भारतीय पंतप्रधानांच्या भेटीची आठवण म्हणून मंदिराच्या परिसरात मोदी यांच्या हस्ते एका 'बोधीवृक्षा'चे रोपण देखील करण्यात आले.

Embeded Object

Embeded Object


यानंतर म्यानमार स्वातंत्र्याचे जनक मानल्या जाणाऱ्या आंग सान यांच्या समाधीला तसेच यांगोन येथे असलेल्या व आंग सान यांच्या नावे उभारण्यात आलेल्या संग्रहालयाला देखील त्यांनी यावेळी भेट दिली. यावेळी म्यानमारच्या सल्लागार आणि आंग सान यांच्या कन्या आंग सान सुकी या देखील मोदींसह याठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी म्यानमारच्या इतिहासासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली.

Embeded Object

Embeded Object


भारतातील मुघल सत्तेचा शेवटच्या बादशहा बहादूर शाह जफर याच्या समाधीला देखील मोदींनी भेट दिली. यांगोनमध्येच असलेली या समाधीमध्ये थोडा वेळ थांबून मोदींनी समाधीवर पुष्प अर्पण केले. व आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात म्यानमारमधील प्रसिद्ध कालीबरी या हिंदू मंदिर भेट देऊन देवींचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली तसेच पंतप्रधानांनी स्वतः देवीची आरती केली.

Embeded Object

Embeded Object