पश्चिम अटलांटिक सागरात आर्मा वादळाचा धुमाकूळ'
 महा त भा  07-Sep-2017


बह्मास : गेल्या वर्षी हैतीमध्ये हुर्रिकेन मॅथ्यू या चक्रीवादळने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एक वर्षानंतर हैती जवळील अटलांटिक सागरात निर्माण झालेल्या हुर्रीकेन आर्मा या वादळाने हैतीच्या आसपासच्या बेटांवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे पश्चिम अटलांटिक सागरातील अनेक बेटांना याचा फटका बसला आहे. लाखो नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ आली असून काही बेटांवरील शहरे मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाली आहेत.


हैतीच्या पश्चिमोत्तर भागात असलेल्या बह्मास या देशाला या वादळाचा मोठा फटका बसला आहे. ताशी १४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या बेटांवर शहरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळामुळे लाखो नागरिक आणि विदेशी पर्यटक बह्मासमध्ये अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे बह्मासच्या हद्दीतील बेटांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून किनारी प्रदेशावर मोठमोठ्या लाटा येऊन धडकत आहे. पूर आणि वादळामुळे अनेक मजली इमारती देखील कोसळल्या आहेत. यामुळे अनेक नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी असलेल्या मुलभूत सुविधा देखील ठप्प पडल्या असून यामुळे बचाव कार्यात देखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान बेटांवर अजूनही वादळाचा जोर कायम असल्यामुळे जीवित आणि वित्तहानीचा नेमका आकडा कळू शकलेला नाही.

Embeded Object

Embeded Object


अमेरिका आणि इतर देशांनी या बेटांवर फसलेल्या आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु वादळाचा जोर अधिक असल्यामुळे यामध्ये कोणत्याही देशाला यश मिळत नाही. हे वादळ अमेरिकेच्या दिशेने सरकू लागले असल्यामुळे अमेरिकेच्या किनारी प्रदेशात आलेल्या फ्लोरिडा या भागात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना किनारी प्रदेशातून दूर सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आले असून संपूर्ण राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Embeded Object


गेल्या चार दिवसांपूर्वी हे वादळ पश्चिम अटलांटिक सागरात निर्माण झाले आहे. सागरी प्रदेशात झालेल्या वातावरणातील बदलामुळे हे वादळ निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारचे हुर्रिकेन मॅथ्यू नावाचे वादळ कॅरेबियन सागरात निर्माण झाले होते. या वादळाने हैती या देशामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता. हैतीच्या किनारी भागातील जवळजवळ ९० टक्के भाग या वादळाने नष्ट केला होता. तसेच ९०० अधिक लोकांचा बळी वादळाने अवघ्या ५ दिवसांमध्ये घेतला होता.