मेक माय ट्रीपचे अध्यक्ष आशिष कश्यप यांचा राजीनामा
 महा त भा  07-Sep-2017


मुंबई : गो आयबीबो ग्रुपचे सहसंस्थापक आणि मेक माय ट्रीपचे अध्यक्ष आशिष कश्यप यांनी काल रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कश्यप यांचा राजीनामा बोर्डने स्वीकारला असून त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे मेक माय ट्रीपकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या विषयी आणखीन कसलीही ठोस माहिती पुढे आलेली नाही.


मेक माय ट्रीपकडून जारी करण्यात आलेल्या माहिती नुसार कश्यप यांचा राजीनामा बोर्डकडून स्वीकारण्यात आला आहे. तसेच येत्या ३० सप्टेंबरपर्यंत त्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत कश्यप हे मेक माय ट्रीपचे अध्यक्षपदावर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कश्यप यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


गेल्या वर्षीच गो आयबीबो आणि मेक माय ट्रीप या दोन्ही कंपन्या एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गो आयबीबो ग्रुपचे सहसंस्थापक असलेल्या कश्यप यांची मेक माय ट्रीपच्या अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली होती. परंतु दहा महिन्यांच्या आतच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अनेक उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.