नाविका सागर परिक्रमेसाठी भारतीय महिला सज्ज
 महा त भा  06-Sep-2017गोवा :  नाविका सागर परिक्रमा या खास अभियानासाठी भारताच्या ६ नाविका सज्ज झाल्या आहेत. १० सप्टेंबर २०१७ रोजी या नाविका विश्व परिक्रमेसाठी निघणार आहेत. आयएनएसव्ही तरिणी या जहाजातून या ६ महिला ३ दिवसांनी निघणार आहेत. ८ महीन्यात २१६०० सागरी मैल पार करणार असल्याने हे अभियान म्हणजे एका मोठ्या परीक्षेहून कमी नाही. या सर्व महिला स्वेच्छेने देशासाठी हे करण्यासाठी तयार झाल्या आहेत.

 

Embeded Object

कोण आहेत या महिला : 

ले. कमाण्‍डर वर्तिका जोशी, ले. कमाण्‍डर प्रतिभा जामवाल, पी. स्‍वाति,  ले. एस. विजया देवी, बी. एश्‍वर्या आणि पायल गुप्‍ता असा हा महिला या सफरीसाठी जाणार आहेत. 


गेल्या वेळच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या महिलांचे अभिनंदन केले होते , तसेच त्यांचे हे अभियान यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. भारतासाठी हा एक अत्यंत गौरवाचा क्षण आहे. हे एक मोठे अभियान आहे. 

 

ही परिक्रमा ५ भागांमध्ये होणार आहे, ज्यामध्ये ४ बंदरांचा समावेश करण्यात आला आहे. फ्रेमन्‍टल (आस्‍ट्रेलिया), लिटलेटन (न्‍यूजीलैंड), पोर्ट स्‍टेनले (फॉकलैण्‍डस) आणि केप टाउन (दक्षिण अफ्रीका) अशी ही ४ बंदरं आहेत. मार्च २०१८ मध्ये ही यात्रा संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आयएनएसव्ही तरिणी बद्दल थोडेसे :

- आयएनएसव्ही तरिणी हे जहाज ५५ फुट आकाराचे जहाज आहे, ज्याचा निर्माण भारतात झाला आहे, आणि या वर्षीच या जहाजाला भारतीय नौदलात सामिल करण्यात आले आहे. 

- आयएनएसव्ही तरिणी हे जहाज १७ मीटर लांब, ५ मीटर रुंद आणि २३ टन क्षमतेचे आहे.

- गोव्याच्या एक्वेरियस शिपयार्डमध्ये हे जहाज बनवले गेले आहे.

- या जहाजाच्या माध्यातून ८ महीन्यात २१६०० सागरी मैल या अभियानात पार करण्यात येणार आहे. 

या अभियानात सहभागी होण्यासाठी एकूण २० महिला नाविकांनी अर्ज केला होता, यापैकी ६ नाविकांची निवड करण्यात आली आहे. या अभियानात पुढे काय होते, आणि या नाविकांचे अनुभव काय असतील हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.