भारत - म्यानमार यांच्यात अकरा करारांवर स्वाक्षऱ्या
 महा त भा  06-Sep-2017


नेपिडो (म्यानमार) : भारत आणि म्यानमार यांच्यात अकरा करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांमधील परस्पर संबंध आणखीन दृढ व्हावेत या उद्देशाने सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांशी निगडीत हे अकरा करार करण्यात आले आहेत. 'म्यानमार हा भारताचा शेजारील राष्ट्र असून त्याची प्रगती आणि विकास व्हावा, यासाठी भारत नेहमी म्यानमारला सहाय्य करेल' असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.


म्यानमार सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. राखायीनमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे तसेच देशाची कमजोर होत चाललेली अर्थ व्यवस्था या सर्वांमध्ये देशाला सावरण्याचे अत्यंत कठीण कार्य सुकी या करत आहेत, अशावेळी शेजारील राष्ट्र म्हणून म्यानमारला मदत करणे हे भारताचे कर्तव्य असल्याचे मत मोदींनी त्यावेळी व्यक्त केले. तसेच भारताला देखील अशा अनेक घटनांचा अनुभव आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीचा हा अनुभव म्यानमारला देखील फायदेशीर ठरेल व म्यानमारमध्ये पुन्हा एकदा लोकशाही उभी राहील,' असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.


भारत आणि म्यानमार यांच्या सागरी आणि भौगोलिक सीमा या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांची सुरक्षा ही एकमेकांवर अवलंबून आहे. अशावेळी दोन्ही देशांनी आपापसातील सैनिकी संबंध वाढवण्यावर देखील भर दिला पाहिजे, असे मोदी म्हणाले. म्यानमारचा मदतीसाठी त्याच्या सर्व मित्र राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Embeded Object

Embeded Object


म्यानमारच्या स्टेट कॉन्सिलर आंग सान सुकी यांनी देखील यावेळी आपले मत मांडले. भारत आणि म्यानमार यांच्यातील मैत्रीला यंदा ७० वर्ष पूर्ण होत आहेत, आजपर्यंत भारताने म्यानमारला विविध क्षेत्रांमध्ये मदत केली आहे. म्यानमारच्या सीमेवरील दहशतवाद नष्ट करणे, एका देशाला राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत भारताने आजपर्यंत केली आहे. दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासामुळेच आजपर्यंत दोन्ही देशांचे संबंध टिकले आहेत, असे मत सुकी यांनी यावेळी व्यक्त केले.

हे आहेत अकरा करार :

Embeded Object

 

भारत करणार म्यानमारच्या ४० नागरिकांची सुटका

दोन्ही देशांमधील नागरिकांमधील परस्पर संबंध वाढावेत, यासाठी भारत सरकारने म्यानमारमधील नागरिकांना देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारताच्या सागरी आणि भौगोलिक सीमेत अटक करण्यात आलेल्या म्यानमारच्या ४० नागरिकांची देखील भारताकडून लवकरच सुटका करण्यात येईल, असे मोदींनी आज स्पष्ट केले. .