शाहरुख नंतर प्रियंकाने घेतली दिलीप साहेबांची भेट!
 महा त भा  05-Sep-2017

 
गेल्या अनेक महिन्यांपासून बोललीवूडमधील प्रसिद्ध व जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावत चालली आहे. तीन आठवड्यांपूर्वीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर योग्य ते उपचार झाल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना घरी पाठवले गेले. त्यानंतर लगेचच शाहरुख खानने दिलीप कुमार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व प्रकृती बाबत विचारणा केली होती. 
 
Embeded Object
 
शाहरूखनंतर आता प्रियांका चोप्राने काल दिलीप साहेबांची व सायरा बानू यांची भेट घेतली. प्रियंकाने या दोघांसोबत बराच वेळ घालवला, त्यांच्याशी चर्चा केली व साहेबांच्या प्रकृतीची अदबीने विचारणाही केली. या सगळ्याने प्रभित झाल्याने या भेटीचे छायाचित्र व त्यासंबंधी दोन वाक्य दिलीप कुमार यांच्या ट्विटर वरून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 
 
Embeded Object
 
दिलीप कुमार यांच्या पोस्टला प्रियांकानेही तितकाच आदरयुक्त व प्रेमळ प्रतिसाद दिला आहे. प्रियांका म्हणतीये, ''तुमच्या दोघांनाही भेटून आनंद झाला. साहेबांची प्रकृती ठीक असल्याचे पाहिल्यावर खूपच बरं वाटलं. ''