आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी सुषमा स्वराज रशियात दाखल
 महा त भा  05-Sep-2017

 

ब्लादिवोस्तोक (रशिया) : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आजपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी रशियात दाखल झाल्या आहेत. या परिषदेमध्ये भारतासोबत जपान, दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम व इतर अनेक देश सहभागी होणार आहेत. या दौऱ्यावेळी रशियातील वाढत्या संधींमध्ये भारताद्वारे धोरणात्मक भागिदारी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Embeded Object

या परिषदेच्या उद्घाटन समारोहमध्ये सुषमा स्वराज उपस्थित असणार आहेत. त्यानंतर रशियाचे उपपंतप्रधान युरी त्रुत्नेव, परराष्ट्र मंत्री सेरगेई लाव्रोव आणि रशियाच्या पूर्व भागांतील काही राज्यपाल यांच्याशी होणाऱ्या एकत्रित परिषदेत त्या संवाद साधणार आहेत.

Embeded Object

या परिषदेमध्ये ५५ देशांतील ७ हजार २३ व्यावसायिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या परिषदेमध्ये २१६ आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधात करार झाले होते. या करारांचे मूल्य ३ हजार २०० कोटी अमेरिकन डॉलर इतके होते. यावर्षी यातील २ हजार ८० कोटी अमेरिकन डॉलर एवढे मूल्य असलेले ३२ प्रकल्प मांडले जाणार आहेत.