लखनऊमध्ये उद्यापासून मेट्रो धावणार
 महा त भा  05-Sep-2017

 

लखनऊ (उत्तरप्रदेश): उत्तरप्रदेशमधील लखनऊ या शहरात उद्यापासून मेट्रो धावणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री राजनाथ सिंह आज संयुक्तपणे लखनऊ मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. हिरवा झेंडा दाखवून योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.

 

पहिल्या टप्प्यात ही मेट्रो ट्रान्सपोर्ट नगर ते चारबाग या मार्गाने धावणार असून या दरम्यान ती साडे आठ तासांचा प्रवास कापणार आहे. यामुळे लखनऊ शहरातील गर्दी आणि वाहतूक नियंत्रणात येण्यास मदत मिळेल. या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी मिळाला असून अशा प्रकारचे प्रकल्प केंद्र सरकार वाराणसी, कानपूर, आग्रा आणि गोरखपूर या शहरांमध्ये देखील सुरु करणार आहेत.

 

केंद्र सरकारने काही काळापूर्वीच नवीन मेट्रो रेल्वे नीतीला मंजुरी दिली असल्याने असे प्रयोग देशात सुरु करण्यात येणार आहे. देशामध्ये मेट्रोचे जाळे पसरविण्यासाठी वरील प्रकल्प केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आला आहे.