कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच सोबत असणार - आ. प्रशांत ठाकूर
 महा त भा  30-Sep-2017


पनवेल : अ सिडकोच्या विविध नोडमध्ये काम करणार्‍या सफाई कामगारांच्या समस्यांविषयी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष बी. के. राजे यांनी संघटनेच्या व सफाई कामगारांच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी आ. प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. ”या कामगारांच्या हक्कांसाठी मी नेहमीच सोबत असून लवकरच याविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेऊन या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मागणी केली जाईल.” असे आ. ठाकूर यांनी आश्‍वासन दिले.

सिडको घनकचरा व्यवस्थापनाची सेवा दि. 1 ऑक्टोबर रोजी पनवेल पालिकेला हस्तांतरित करण्याच्या तयारीत आहे, परंतु पनवेल पालिका या सेवेत सिडकोकडून अनेक त्रुटी असल्याने व पालिकेकडे पुरेशी क्षमता व मनुष्यबळ नसल्याने ही सेवा हस्तांतरित करण्यास इच्छुक नसून रा हस्तांतरणाच्या वादात सफाई कामगारांचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता होती. न्यायालयाने या कामगारांच्या सुरक्षिततेचा विचार करून सिडको आणि सफाई कामगारांच्या सेवा हस्तांतरणास स्थगिती दिली आहे.या हस्तांतरणास न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, या कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासंदर्भात महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने आ. ठाकूर यांना निवेदन दिले. आपण लवकरच सिडकोचे एमडी भूषण गगराणी यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.