ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
 महा त भा  30-Sep-2017


मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे काल रात्री मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्वचेच्या कर्करोगामुळे ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांनी आजवर ३०० हून अधिक चित्रपटातून काम केले आहे.


मुळचे अमेरिकन वंशाचे असेलेल्या टॉम अल्टर यांनी १९७६ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या. शतरंज के खिलाडी, क्रांती, गांधी यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. याशिवाय अनेक टीव्ही मलिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.


अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनही केले. तसेच नव्वदीच्या शतकात त्यांनी क्रिडा पत्रकारिताही केली. अभिनय आणि लेखन यासाठी त्यांना भारत सरकारकडून २००८ साली पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित कऱण्यात आले होते.

त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही शोक व्यक्त केला आहे. चित्रपटप्रेमी त्यांना सदैव लक्षात ठेवतील. तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत. 

Embeded Object