डॉ. मशहूर गुलाटीचे हे गाणे पाहिले काय?
 महा त भा  29-Sep-2017

 

हास्य कलाकार कपिल शर्मा याच्या ‘कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा’ या शो मधील प्रसिद्ध कलाकार डॉ. मशहूर गुलाटी अर्थांत सुनील ग्रोवर याचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘दारू पिके गिरना’ असे या गाण्याचे मनोरंजक बोल असून सुनील ग्रोवर या गाण्यामध्ये अंगाशी येईल इतपत दारू पिलेला दाखविला आहे.

 

Embeded Object

 

सध्या सोशल मिडीयावर या गाण्याला खूपच पसंती मिळत आहे. सुनील ग्रोवरच्या अभिनयाचे सगळेच लोक चाहते आहे. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा’ या शो मधील डॉ. मशहूर गुलाटी हा रोल तर सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. त्याच आधारावर हे नवीन गाणे तयार करण्यात आले आहे.

 

या गाण्यात सुनील ग्रोवर येवढी दारू पितो की त्याला चालणे देखील कठीण होऊन जाते. तसेच त्याचे शेजारी आणि त्याची बायको त्याला मारून घरातून बाहेर काढून टाकतात. मनोरंजन करणारे हे गाणे तुम्ही देखील एकदा नक्कीच पहा.