चाहत्यांना सोहा-कुणालकडून गोड बातमी
 महा त भा  29-Sep-2017

 

मुंबई: अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्या घरी एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. सोहा आणि कुणालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून या दोघांना एक छान मुलगी झाली आहे. ही गोड बातमी आज सकाळी कुणालने त्याच्या स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे.

 

Embeded Object

 

आजच्या शुभ दिनी एका छोट्या मुलीचे आगमन आमच्या घरी झाले आहे. तुमचे असणारे प्रेम आणि आशीर्वादासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार असे ट्वीट करत कुणालने ही गोड बातमी आज चाहत्यांना दिली आहे. २०१४ मध्ये प्रेमबंधनात अडकून दोघांनी जानेवारी २०१५ मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या दोघांनाही पुत्री रत्न प्राप्त झाली आहे.


अभिनेत्री करीना कपूरने डिसेंबरमध्ये तैमुरला जन्म देवून खान कुटुंबियांना गोड बातमी दिली होती. त्यानंतर आता सोहाने देखील गोड बातमी देवून खान कुटुंबियांना दिवाळीचे चांगलेच गिफ्ट दिले आहे. त्यामुळे आता छोट्या तैमुरला एक छान छोटीशी बहिण देखील गिफ्ट मिळाली आहे.