नागराजचा बहुप्रतिक्षित 'दि सायलेन्स' चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
 महा त भा  26-Sep-2017


 
सैराटच्या घवघवीत यशानंतर नागराज मंजुळेच्या 'दि सायलेन्स' या चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षभरापासून रंगत आहे. नागराजने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले नसून तो एका वेगळ्या भूमिकेतून अभिनेता म्हणून आपल्याला दिसणार आहे. याआधीही नागराज दोन-तीन चित्रपटातून अभिनय करताना आपल्याला दिसला होता पण त्या छोट्या भूमिका होत्या. 'दि सायलेन्स'मधून त्याला प्रथमच प्रमुख व्यक्तिरेखेच्या स्वरूपातील भूमिका मिळाली आहे. या चित्रपटाचा पोस्टर आज सोशल मीडियावर लाँच झालं असून, हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 

वेगळे व आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गजेंद्र अहिरे यांनी 'दि सायलेन्स' दिग्दर्शित केला असून अश्विनी सिधवानी हिने याची कथा लिहिली आहे. नागराज सोबत अंजली पाटील व रघुवीर यादव हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. भारताकडून ऑस्कर साठी निवड झालेल्या 'न्यूटन' या हिंदी चित्रपटात अंजली व रघुवीर या दोघांनीही अफलातून काम केलं आहे. दि सायलेन्स चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर असे लक्षात येते की हा एक प्रकारे स्त्रीयांच्या व्यथांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. यापूर्वीच 'दि सायलेन्स'ने अनेक मोहत्सवातील पुरस्कार मिळवले असल्याने या विषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 
 Embeded Object