पद्मावतीमधील शाहीदचा हा शाही लुक पाहिला काय?
 महा त भा  25-Sep-2017

 

मुंबई : संजय लीला भन्साळी याच्या बहुचर्चित 'पद्मावती' या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आल्यानंतर आज या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शाहीद कपूरचा या चित्रपटातील लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. शाहीद कपूरने स्वत: त्याच्या या लुकचे छायाचित्र सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

 Embeded Object

धारदार वाढलेल्या मिश्या आणि चेहऱ्यावर राजेशाई थाट शाहीदला खूपच शोभून दिसतो आहे. या लुकमध्ये शाहीद एक योद्धाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दोन पोस्टर दीपिकाने सोशल मिडीयावर शेअर केले होते. यामध्ये दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसून आली.

 Embeded Object

पहिल्या पोस्टरमध्ये दीपिका आणि तिच्या मागे हजारो राजपूत स्त्रिया जोहरसाठी उभ्या असलेल्या दाखवण्यात आल्या आहेत. तसेच त्या पोस्टरवर 'देवितुल्य राणी' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. ‘बाजीराव-मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळी यांचा हा दुसरा बिग-बजेट चित्रपट असल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.