चलतायं का तुम्ही सगळे पण हंपीला?
 महा त भा  25-Sep-2017

 

प्रत्येकालाच आयुष्यात कुठे न कुठे फिरायची आवड असतेच अश्याच प्रवास प्रेमींसाठी एक आगळा वेगळा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ‘हंपी’ या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘पर्यटन’ या विषयावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी खात्री बाळगण्यास काही वावगे ठरणार नाही.

 

 Embeded Object

 

अभिनेता प्रियदर्शन जाधव या चित्रपटात मुख्यभूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पर्यटकाच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एका वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट ठरणार आहे. प्रियदर्शन जाधव टिपिकल कर्नाटक येथील रिक्षाचालक दाखवण्यात आला असून त्याची भाषा नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. या टीझरमध्ये हंपी येथील निसर्गरम्य ठिकाण आणि तेथील संस्कृतीचे दर्शन घडवून आणले आहे.

 

हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हंपी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हंपी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.