सार्वजनिक उद्योगातील कंपन्याः देशाचा आधार
 महा त भा  21-Sep-2017
 

 
कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ऊर्जेचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताच्या आर्थिक विकासासाठी चांगली व परवडणार्‍या किमतीत ऊर्जा मिळणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर वेगात प्रगती करणार्‍या देशांत भारत वरच्या स्थानावर आहे. आर्थिक वर्ष २०१६ साली भारताच्या जीडीपीत ७.६ टक्के वाढ झाली होती, तर २०१७च्या पहिल्या तिमाही अखेरीस ७.१ टक्के व दुसर्‍या तिमाही अखेरीस ७.३ टक्के वाढ झाली होती. भारताने रशियाला मागे टाकून चीन व अमेरिकेनंतर सर्वाधिक ऊर्जा वापरणारा जगातला तिसरा देश आहे. भारतातील तेल व वायू कंपन्या देशात वापरल्या जाणार्‍या ऊर्जेपैकी ३५ टक्के ऊर्जा वापरतात. तेल वापरातही जपानलामागे टाकून चीन व अमेरिकेनंतर जगात भारत तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. भारत सर्व प्रयत्न करून देशात तेल व वायुचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.
 
सध्या आपला देश तेल व वायुची ७७ टक्के निर्यात करतो. ती वाढ २०२२ पर्यंत ६७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी निश्चित केले आहे. भारतात तेल व वायू उद्योगात सार्वजनिक क्षेत्रात ओएनजीसी, ओआयएल, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल व गेल या कंपन्या कार्यरत आहेत. ओएनजीसी ही कंपनी कच्चे तेल व नैसर्गिक वायू या उत्पादनांत भारतात अग्रेसर आहे. भारतात होणार्‍या उत्पादनापैकी ७० टक्के उत्पादनात या कंपनीचा हिस्सा आहे. ओएनजीसी ही भारतातील पूर्णतः एका एकात्मिक पेट्रोलियम कंपनी आहे. पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस ही या सर्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू उद्योगातील कंपन्यांची उत्पादने आहेत. ओएनजीसी ही या उद्योगातील सर्वात जास्त नङ्गा मिळविणारी व लाभांश देणारी कंपनी आहे. इंडियन ऑईल कंपनीची ३ लाख ९९ हजार ६०१ कोटी रुपयांची उलाढाल आहे. आर्थिक वर्षी २०१६ साली या कंपनीस १० हजार ३९९ कोटी रुपयांचा नङ्गा झाला होता. ही कंपनी अशुद्ध तेल व वायू उत्पादित करते तसेच पेट्रोकेमिकल्सचे मार्केटिंग करते. या कंपनीच्या श्रीलंका, मॉरिशस व युएई येथे उपकंपन्या आहेत. या कंपनीचे भारतात व परदेशात मिळून २० संयुक्त प्रकल्प आहेत. पेट्रोलियम उत्पादनांचा सुमारे ५० टक्के हिस्सा या कंपनीकडे आहे. हिची राष्ट्रीय रिङ्गायनिंग क्षमता ३५ टक्के आहे. भारतातील २३ तेल शुद्धीकरण केंद्रांपैकी ११ तेल शुद्धीकरण केंद्रे या कंपनीच्या मालकीची असून, हिची तेल शुद्धीकरणाची वार्षिक क्षमता ८०.७ दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. या कंपनीची ६२०० किसान सेवा केंद्रे ग्रामीण बाजारपेठांत आहे. कंपनीची विमानात इंधन भरणारी १०१ स्टेशन्स असून, २१ एलपीजी बॉटलिंग प्लान्ट आहेत. इंधने एलपीजी स्वयंपाकाचा गॅस ९ कोटी ८८ लाख घरांत पोहोचलेला आहे. विमानात भरल्या जाणार्‍या इंधनाच्या ६३.६ टक्के बाजारी हिस्सा या कंपनीकडे आहे.
 
महारत्न गेल (इंडिया) लिमिटेड ही भारतातील नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची उलाढाल ५६ हजार ७४२ कोटी रुपये असून, ही कंपनी पेट्रोकेमिकल्सही उत्पादित करते. सूर्यापासून ऊर्जा व पवन ऊर्जा या क्षेत्रांतही ही कंपनी कार्यरत आहे. भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासात या कंपनीचा मोठा हातभार आहे. कंपनीच्या सिंगापूर व अमेरिका येथे उपकंपन्या आहेत. 
 
या कंपन्या जेव्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांवर नियंत्रण होते तेव्हा तोट्यात होत्या.आता नियंत्रण उठविण्यात आल्यामुळे या सर्व कंपन्या ङ्गायदा करू लागल्या आहेत. सुदैवाने आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये इंधनाचे दर आता पूर्वीसारखे ङ्गार चढेही राहिलेले नाहीत. याचा देशाला ङ्गायदा झाला आहे. देशाच्या आयात खर्चात कपात झाली आहे. यासाठी जितके इंधन गरजेचे आहे, तितके इंधन आपला देश उत्पादित करू शकत नाही. त्यामुळे इंधन आयात करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत तेलाचे दर घसल्यामुळे, आपल्या देशाचा आयातीवरील खर्च कमी झाला आहे. आपला देश तेल व सोने सर्वाधिक आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत इंधनाचे दर कमी झाले असले तरी भारतीय नागरिकांना ङ्गार चढ्या दरानेच या दरात इंधन विकत घ्यावे लागते. भारतातील सर्व राज्यांचा विचार करता गोवा राज्यात इंधनाचे दर मात्र कमी आहेत.
 
भारत सरकारचा या अनेक कंपन्यांचे काही मोजक्या कंपन्यांत एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव आहे. या एकत्रिकरणानंतर अस्तित्वात आलेल्या कंपन्या जागतिक पातळीवर वरचे स्थान मिळवू शकतील. या कंपन्यांचे एकत्रिकरण करण्याचे सुतोवाच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या गेल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले होेते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपला देश कृषिप्रधान होता. उद्योगक्षेत्र ङ्गार छोटे व मर्यादित होते. बचत कमी होती.
 
गुंतवणूक फारशी नव्हती, पायाभूत सोयींचा अभाव होता. उत्पन्नाचे योग्य वाटप नव्हते. रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. राज्या-राज्यांतील आर्थिक प्रगतीत विषमता होती व कौशल्य असलेले कामगार नव्हते. या सर्व पार्श्र्वभूमीवर औद्योगिकीकरण करण्यासाठी त्यावेळी सर्व कंपन्या सार्वजनिक क्षेत्रात उघडण्यासाठी प्रयत्न करून त्या उघडल्या गेल्या. यापैकी सरकारी ढिल्या कारभारामुळे गाशा गुंडाळला असेल, पण काही कंपन्यांनी भारताच्या आर्थिक जडणघडणीत फार मोलाचा वाटा उचलला. या कंपन्यांनी देशात सामाजिक व आर्थिक बदल घडविला. १९५४ साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ’’सार्वजनिक उद्योगातील या कंपन्या म्हणजे आधुनिक भारतातील देऊळे आहेत,’’ असे वर्णन केले होते.
 
भारतात १९४८ साली पहिली, इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज ही सार्वजनिक उद्योगातील कंपनी अस्तित्वात आली. २०१६ या आर्थिक वर्षी ही संख्या २४४ इतकी होती व या सर्व कंपन्यांचा मिळून नफा १ लाख १५ हजार ७६७ कोटी रुपये इतका होता. १६५ सार्वजनिक उद्योगातील कंपन्या नफ्यात आहेत. २०१६ या आर्थिक वर्षी या कंपन्यांनी लाभांश, व्याज, कंपनी कर व अबकारी कर यांच्या मार्गेे शासनाला २ लाख ७८ हजार ७५ कोटी रुपये दिले. यात १.२३ दशलक्ष भारतीय कामकरतात. २०१६ या वर्षी सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांना उत्पादनांतून १८ लाख ५४ हजार ६६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. याचा हिस्सा एकूण उत्पन्नाच्या ६१ टक्क्यांहून अधिक होता. सेवा क्षेत्राच्या एकूण उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न होते, तर खाण उद्योग व ऊर्जा यांच्या उत्पन्नाचा हिस्सा अनुक्रमे ११.४७ टक्के व ६.७६ टक्के होता. ३१ मार्च २०१६ अखेर ३२० सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांची वित्तीय गुंतवणूक ११ लाख ७१ हजार ६४४ कोटी रुपये इतकी होती. १९९१च्या आर्थिक उदारीकरणानंतर या कंपन्यांकडून उत्पादकता व नफ्याला जास्त महत्त्व दिले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत या कंपन्यांपुढे मोठ्या संधी व आव्हाने उभी राहिली आहेत. कित्येक केंद्रीय सार्वजनिक उद्योगातील कंपन्या आता जागतिक पातळीवर पोहोचल्या आहेत. व त्यांच्या यशाचे कारण म्हणजे या कंपन्यांना केंद्र शासनाने अधिक स्वायत्तता दिली आहे. ’फॉर्च्युन ५००’ च्या ग्लोबल कंपन्यांच्या यादीत ७ भारतीय कंपन्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५ कंपन्या या सार्वजनिक उद्योगातील आहेत.
 
२०१५ फोर्ब्स ग्लोबल २०००च्या यादीत ५६ भारतीय कंपन्या आहेत. त्यापैकी ३१ सार्वजनिक उद्योगातील कंपन्या आहेत. यातून या कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान लक्षात येते. देशाच्या बँकिंग उद्योगात स्टेट बँकेसह अन्य सार्वजनिक उद्योगातील बँका महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. जीवन विमा व्यवसायात एलआयसी व सर्वसाधारण विमा उद्योगात एकूण ५ अशा सर्व सार्वजनिक उद्योगातील कंपन्या महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत.
 
उद्योगनिहाय सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांचे असलेले वर्चस्व- १)ओएनजीसी- तेल व वायू सर्वाधिक उत्पादित करणारी कंपनी २) एनटीपीसी- सर्वाधिक ऊर्जा उत्पादित करणारी कंपनी. ३) आयओसी- सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प व पेट्रोलियमपदार्थ उत्पादित करणारी सर्वात मोठी कंपनी ४) गेल- गॅस मार्केटिंगमधील सर्वात मोठी कंपनी ५) एनएचपीसी- जलविद्युत उत्पादनातली अग्रेसर कंपनी ६) सेल- पोलाद उद्योगातील सर्वात मोठी कंपनी. कोणतीही खाजगी कंपनी या कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत.
 
-शशांक गुळगुळे