'पद्मावती'चे पहिले पोस्टर प्रदर्शित
 महा त भा  21-Sep-2017



मुंबई : संजय लीला भन्साळी याच्या बहुचर्चित 'पद्मावती' या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लुक तसेच पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्रपटाची मुख्यनायिका असलेल्या दीपक पदुकोन हिने आपल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. दीपक चाहत्यांनी देखील तिच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.


चित्रपटाचे दोन पोस्टर दीपिकाने आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यामध्ये दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसून येत आहे. राणी पद्मावतीच्या पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. पहिल्या पोस्टरमध्ये दीपिका आणि तिच्या मागे हजारो राजपूत स्त्रिया जोहरसाठी उभ्या असलेल्या दाखवण्यात आल्या आहेत. तसेच त्या पोस्टरवर 'देवितुल्य राणी' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.

Embeded Object


दुसऱ्या पोस्टरमध्ये दीपिका राणीच्या भूमिकेत दिसत असून एका शिवमंदिरात ती उभी असल्याचे दाखवण्यात आले आहे. दीपिकाच्या पाठीमागे शिवलिंग असून त्याच्या भोवती अनेक त्रिशूळ असल्याचे दाखवण्यात आले आहेत.

Embeded Object


'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाच्या यशानंतर भन्साळी यांनी 'पद्मावती' या चित्रपाटाची घोषणी केली होती. परंतु काही वादग्रस्त मुद्दांमुळे चित्रपटाच्या चित्रीकरणात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. भन्साळी आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या जागी काही संघटनाकडून हल्ले देखील करण्यात आले होते. तरी देखील भन्साळी यांनी चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय बनला होता. येत्या १ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षलांच्या भेटीला येणार आहे.