रक्ताची नासाडी
 महा त भा  21-Sep-2017


 

 

राज्यभरात जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ११ हजार ७७४ लिटर रक्त वाया गेले. सहा महिन्यांत पालिका आणिराज्य सरकारने १ लाख ८५ हजार ८९४ युनिट रक्त जमा झाले होते. त्यापैकी ३३ हजार ६४२ युनिट रक्त वाया गेले. म्हणजेच एकूण जमारक्तापैकी १८ टक्के रक्त मुदत निघून गेल्याने वाया गेले आहे. चेतन कोठारी यांनी माहिती अधिकाराखाली ही माहिती सरकारकडून मिळवली खरी,पण हे फक्त हिमनगाचे केवळ एक टोक म्हणावे लागेल. मुदत उलटून गेल्यानंतर वापरासाठी अयोग्य असे रक्त वाया घालवणाया राज्यांतमहाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्येसुद्धा आघाडीवर आहेत. एकट्या महाराष्ट्राचा विचार करता, आपल्या राज्याला दरवर्षीतब्बल १३ लाख रक्तपिशव्यांची गरज असते. पण साहजिकच रक्तादानासंबंधी असलेल्या अनास्थेमुळे ‘मागणी तेवढा पुरवठा’ हे गणितरक्तसाठ्याच्या बाबतीत कधीच अचूक ठरत नाही आणि आता त्यात असलेल्या रक्ताचीही अशी मुदत उलटून होणारी नासाडी! भारतात रक्ताचीमागणी १२ दशलक्ष युनिट इतकी आहे, पण पुरवठा फक्त ९ दशलक्ष युनिट आहे. म्हणजेच, अजूनही ३ दशलक्ष युनिट रक्ताची कमतरता असूनपरिणामस्वरुप वेळीच योग्य रक्तगटाचा पुरवठा न झाल्याने रुग्णांची दगावण्याची संख्याही मोठी आहे.त्यामुळे भारताला रक्ताची खूप गरज आहे.एका आकडेवारीनुसार, दरवर्षी १० लाख भारतीयांना कर्करोगाची लागण होते. त्यामुळे त्यांना साहजिकच रक्ताची गरज असते. त्याचबरोबरअपघातग्रस्त रुग्णालाही १०० युनिट रक्ताची गरज असते. एड्‌सग्रस्त रुग्णही रक्तपेढ्यांवर अवलंबून असतात. पण भारतात वेळेत रक्त नमिळाल्याने मृत्यूही ओढवल्याच्याही अनेक घटना वेळोवेळी निदर्शनास आल्या आहेत. त्याची फक्त निश्चित अशी आकडेवारी उपलब्ध नाही. पणअमेरिकेत वेळीच रक्तसंक्रमण न झाल्याने मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या ही ४० लाखांच्या घरात आहे. 

खरं तर रक्ताचा अपव्यय होण्याचे प्रमुखकारण म्हणजे वेळीअवेळी होणारी रक्तदान शिबिरे. अनेकदा पुरेसा रक्ताचा साठा असताना रक्तदान शिबिरामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि तेरक्त वेळीच न वापरल्याने वाया जाते. रेकॉर्ड्‌स करण्याच्या हट्टापायी मोठमोठी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच रक्तपेढ्यांमध्ये समन्वयाचामोठ्या प्रमाणात अभाव असल्याने जिथे रक्ताची गरज आहे, तिथे रक्त योग्य वेळी पोहोचत नाही. त्यामुळे सध्या गरज आहे ती नव्यारक्तपेढ्यांच्या समन्वयाची आणि धोरणाची.

 

बिहार मे बहार है...

 

पाच दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी बहुप्रलंबित सरदार सरोवर या जगातील दुस-या क्रमांकाच्या धरणाचे गुजरातमध्ये लोकार्पण केले, तर कालबिहारमधील नहर धरण उद्घाटनापूर्वीच फुटल्याची दुर्दैवी घटना समोर आली. हा निव्वळ योगायोग असला तरी धरणे ज्याप्रमाणे एका मोठ्या क्षेत्रालासुजलाम् सुफलाम् करु शकतात, त्याचप्रमाणे मानवी हलगर्जीपणा आणि नैसर्गिक आपत्तीच्या संकटात हीच धरणे विनाशाचा कडेलोटही करु शकतात.अशा या एकाच देशातील या दोन राज्यांतील विरोधाभास दर्शविणा-या घटना. सरदार सरोवर प्रकल्पाचे कामगेली ५६ वर्षे चालू होते. बयाच वादाच्यागदारोळात हा प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पामुळे गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या महाकाय राज्यांना मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणेबिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नहर धरणाचे कामसुद्धा गेली ४० वर्षे सुरू होते. या प्रकल्पाची किंमत तब्बल ३८९ कोटी रुपये होती. याधरणामुळे २२ हजार ६५८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. पण पाणी वाहून नेणारे, साठवणारे धरणच खुद्द पाण्यातच वाहून गेल्यानेबिहारच्या या धरण बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

विशेष म्हणजे, २० सप्टेंबरला या धरणाचे मुख्यमंत्री नितीशकुमारयांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन होणार होते आणि नेमके आदल्या दिवशीच ही दुर्घटना घडली. सुदैवाने, जीवितहानी झाली नसली तरीआसपासचा परिसर जलमय झाला होता. पूर्ण दाबाने पाण्याचा विसर्ग केल्याने धरणाला तडे गेले आणि धरणफुटी झाली. त्यामुळे या घटनेनंतरधरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

‘कॅग’च्या जुलैच्या अहवालानुसार देशातील एकूण ४,८६२ धरणांपैकी केवळ ३४९ धरणेम्हणजे केवळ ७ टक्के धरणांमध्ये आपात्कालीन व्यवस्थेची यंत्रणा कार्यान्वित आहे, म्हणजे देशातील तब्बल ९३ टक्के मोठी धरणे हे आपात्कालीनपरिस्थिती हाताळण्यासाठी सक्षमनाहीत. त्याचबरोबर अनेक धरणांच्या देखभाल-दुरुस्तीचीही स्थिती बिकट असल्याचे या अहवालात स्पष्टरपणे नमूदकरण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, ‘कॅग’ने बिहारमधील २, उत्तर प्रदेशातील २ आणि बंगालमधील १ अशा एकूण पाच धरणांतील त्रुटीदाखवून दिल्यानंतरही सुधारणेसाठी कुठलीही पावले उचलली गेली नसल्याचे म्हटले आहे. तेव्हा, धरणे ही हवीच, पण त्यांचे नियोजन, बांधणी आणिआपात्कालीन व्यवस्थापन यावरही सरकारने वेळीच लक्ष द्यायला हवे, अन्यथा जलप्रलयांची शक्यता नाकारता येत नाही.

 

-तुषार ओव्हाळ