अश्विनी भावेंची ऑफिशिअल वेबसाईट पाहिलीत का?
 महा त भा  19-Sep-2017


मराठी चित्रपट सृष्टीमधील माधुरी दीक्षित अशी ओळख असणारी अश्विनी भावे आज ४५ वर्षांची आहे. पण तरीही एखाद्या तरुणीला लाजवेल असे तारुण्य त्यांच्या प्रत्येक अदाकारीतून दिसून येते. गेल्या काही दिवसांत अश्विनी भावे एका ग्लॅमरस फोटो मुळे चर्चेत आली होती. हे फोटोशूट नेमकं कशासाठी करण्यात आलं होतं, याचं कारण आज लक्षात आलं आहे. आज अश्विनी भावे यांची मॉडर्न लुक असणारी ऑफिशिअल वेबसाईट लाँच झाली आहे. आणि याच वेबसाईट साठी त्यांनी हे विशेष फोटोशूट केल्याचे दिसून येत आहे. 
 
Embeded Object
 
अश्विनी भावेंची आत्तापर्यंतची कारकीर्द, त्यांनी केलेले चित्रपट, फोटोज, त्यांचे विविध विषयांवरचे लिखाण, मुलाखतींचे व्हिडिओज आदींची माहिती या वेबसाईट वरून त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. एवढाच काय तर, त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर, फेसबुक व इंस्टाग्राम अकाऊंटचे हँडल देखील या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 
 

 
मराठी चित्रपट सृष्टीतील खूप कमी कलाकारांची अशा प्रकारची अद्ययावत वेबसाईट बघायला मिळते. त्यामुळे अश्विनी भावेंच्या या उपक्रमाचे चहुबाजुंनी कौतुकच होत आहे. सिनेजगतातील अनेक लोकांनी याबाबत ट्विट करून हि माहिती लोकांपर्यंतही पोहचवली आहेत. अश्विनी भावे या अमेरिकेत राहत असल्या तरी चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान तसेच प्रमोशन करता त्या बरेच दिवस भारतातच असतात. गेल्या काही महिन्यात त्यांचे 'ध्यानीमनी' व 'मांजा' हे दोन चित्रपट येऊन गेले, त्यावेळी त्या भारतातच होत्या. 
 
Embeded Object