लोकांनो बघा, सनीचं 'लोका लोका' नवीन रॅप सॉंग
 महा त भा  19-Sep-2017


सनी लिऑन आता बॉलीवूड मध्ये चांगलीच स्थिरावली आहे. चित्रपटांमध्ये मोठ्या लांबीच्या भूमिका जरी तिच्या वाट्याला येत नसल्या तरी पाहुणी कलाकार किंवा आयटम सॉंग मध्येतरी तिचा वावर ठरलेला असतोच. आता तर तिला घेऊन स्वतंत्र व्हिडिओ करण्याची क्रेझही आली आहे. यातूनच झी म्युझिकने तयार केलेला 'लोका लोका' हा व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. 

Embeded Object
 
'लोका लोका' हे रॅप प्रकारातील गाणे असून सनी लिऑन, रफ्तार व शिवी यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. आरिफ खानने या गाण्यासाठी संगीत निर्माता, गायक व लेखक अशा तिहेरी भूमिका बजावली आहे. सनीची क्रेझ प्रचंड असल्यामुळे अवघ्या काही तासातच हजारो नेटिझन्सनी हे गाणे पहिले आहे. 
 
Embeded Object