का मिळालं असेल 'कासव'ला सुवर्णकमळ?
 महा त भा  18-Sep-2017

 

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हि जोडी म्हणाली की काहीतरी भन्नाट कलाकृती पाहायला मिळणार असं समीकरण जवळपास आत्तापर्यंत तयार झालं आहे. याच जोडगोळीने मिळून एका वेगळ्याच विषयावरील 'कासव' नावाचा सिनेमा बनविला. ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सुवर्णकमळ' या पुरस्काराने 'कासव'चा गौरव करण्यात आला होता. तेव्हा पासून आजपर्यंत या चित्रपट असं नेमकं काय आहे, याची प्रतीक्षा रसिकांना लागून राहिली होती. 

 
आज अखेर 'कासव' चित्रपटाच्या फेसबुक पेज वरून या चित्रपटाची पहिली झलक प्रसिद्ध करण्यात आली. समुद्राच्या किनारी एक अनोळखी मुलगा एका कुटुंबाला मिळतो आणि सुरु होतो 'कासव'चा आगळा-वेगळा प्रवास. भावे आणि सुकथनकर यांनी यापूर्वीही अशाच धाटणीचे चित्रपट आपल्यासमोर मांडले होते आणि त्याची वेळोवेळी प्रशंसाही झाली. 'कासव'ची पहिली झलक बघितल्यावर याला सुवर्णकमळ का मिळालं असावं याचा थोडासा अंदाज येतो. 

अलोक राजवाडे व इरावती हर्षे हे दोघे जण 'कासव'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसतील. त्यांच्या सोबतीला मोहन आगाशे, किशोर कदम, देविका दफत्तरदारयांच्या सारखी मात्तबर मंडळी सुद्धा अभिनयातून वेगळी छाप सोडताना दिसणार आहेत. समुद्र किनाऱ्यावर सापडलेला हा अनोळखी मुलगा नेमका कोण, त्याला नक्की काय पाहिजे असतं व या सगळ्यामध्ये कासवाचा संबंध काय या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला येत्या ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत.