सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे संतोष माळी
 महा त भा  14-Sep-2017


पनवेल : सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपने शेकापच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून सरपंचपदी संतोष माळी विराजमान झाले आहेत. भाजपकडून संतोष माळी तर शेकापकडून ज्योती केदारी यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये माळी यांना सहा तर केदारी यांना अवघी तीन मते मिळाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोरे यांनी काम पाहिले.


यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचे भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालंडकर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, पं.स. सदस्या तनुजा टेंबे, विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे, युवा नेते सुनील माळी, माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, ज्येष्ठ नेते एम. डी. माळी, लक्ष्मणशेठ गोडिवले, सदाशिव माळी, ह.भ.प. तुकाराम महाराज केदारी, ह.भ.प. महादेव जांभुळकर, देवलोली सरपंच मनस्वी भंडारकर, माजी उपसरपंच भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य अश्‍विनी कुरूंगळे, शिवाजी माळी, सुजाता माळी, अमृता म्हस्कर, माजी सदस्य निलेश माळी, पी. सी. माळी, जे. सी. माळी, अरुण माळी, रोशन पाटील, नितीन माळी, यशवंत कुरूंगळे, कमलाकर माळी, भालचंद्र म्हस्कर, विजय कुरूंगळे, सचिन कुरूंगळे, अंकुश झिंगे यांच्यासह ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.