केवळ ब्ल्यू व्हेल खेळच नाही तर हे खेळही आहेत धोकादायक
 महा त भा  14-Sep-2017
गेल्या काही दिवसांपासून ब्ल्यू व्हेल खेळाची खूप चर्चा आहे. आदी रशिया मध्ये अनक तरुणांचा जीव घेणारा हा इंटरनेट वरील खेळ भारतात कधी प्रसिद्ध झाला हे कळलेच नाही. या खेळाने महाराष्ट्र, पंजाब तसेच मध्यप्रदेश येथील तरुण आणि किशोरवयीन मुलांचा जीव घेतला आहे. मात्र इंटरनेटवरील केवळ ब्ल्यू व्हेल हा एकच खेळ जीवघेणा नाहीये, तर या सारखे आणखी काही खेळ आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे यापैकी कुठलाही खेळ आसपास कुणी खेळत असल्यास त्याला त्वरित सावध करा.

१. सॉल्ट अॅण्ड आईस चॅलेंज : इंटरनेटवर गाजत असलेल्या अनेक खेळांपैकी हा एक खेळ आहे. या खेळामध्ये स्वत:च्या हातावर मीठ टाकून त्यावर बर्फाचा तुकडा वितळत ठेवायचा असतो. ऐकायला हा खेळ जरी सोपा वाटला तरी बर्फ आणि मीठ यांची आपसात रासायनिक क्रिया होवून त्यामुळे हाताला इजा होते. यामध्ये तीव्र वेदना तर होतातच, सोबत हात जळण्याचीही भिती असते. 
२. द चोकिंग गेम : हा खेळ आणखीनच भयानक आहे. यामध्ये समोरच्याचा किंवा स्वत:चा गळा तो पर्यंत आवळायचा असतो जो पर्यंत ती व्यक्ती बेशुद्ध होत नाही. यामध्ये गुदमरल्याने व्यक्तीचा जीव जाण्याची दाट शक्यता असते. तसेच अमेरिकेत या खेळाची क्रेझ वाढल्याने अनेक किशोरवयीन मुलांचा जीव गेल्याची बातमी आली आहे. त्यामुळे ब्ल्यू व्हेल प्रमाणे या खेळाची पाळंमुळं भारतात देखील रुजण्यास वेळ लागणार नाही, जेणेकरुन विद्यार्थ्यांने, पालकांने आणि एकूणच समाजाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
३. द कार्ली लिप चॅलेंज : सेल्फी काढण्यासाठी 'पाऊट' करणाऱ्या मुलींची संख्या आपल्या भारतात देखील मोठ्या प्रमाणात आहे. ब्रिटिश अबिनेत्री किम कार्डीशनची बहीण कार्ली कार्डीशनने या खेळाला सुरुवात केली. यामध्ये सेल्फी काढताना "परफेक्ट" पाऊटसाठी स्वत:च्या ओठांचा आकार बदल्याणाचे आव्हान देण्यात येते, यामुळे अनेक मुलींच्या ओठांचा आकार इतका खराब झाला आहे की त्या ओळखायला येत नाहीत, तर अनेकांच्या ओठांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. हा खेळ देखील सेल्फीच्या नादात जीव गमावण्यासारखाच आहे.
४. फायर चॅलेंज : हा खेळ देखील अत्यंत जीवघेणा आहे. यामध्ये व्यक्तीला स्वत:च्या शरीरावर एक खास 'सॉल्युशन' लावायचे असते व स्वत:ला पेटवायचे असते. यामुळे भाजणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. तसेच मानसिक तणावाखाली किंवा मानसिक आजार असलेल्या नागरिकांना असे खेळ अधिक प्रभावित करतात.

महत्वाची बाब म्हणजे हे करत असताना, आपण हे चॅलेंजेस स्वीकारण्याचे व्हिडियोज यूट्यूब किंवा इतक कुठल्याही सामाजिक माध्यमावरुन टाकायचे असतात, अनेकदा हे चॅलेंजेस पूर्ण करणाऱ्याला पैसे देखील मिळतात. हे खेळ अत्यंत जीवघेणे आहेत. जे ब्ल्यू व्हेलमुळे झाले ते या खेळांमुळे होवू नये यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. "आपल्या देशात कुठे हे खेळ येणार" असे म्हणे म्हणे पर्यंत ब्ल्यू व्हेल खेळाने भारतात ३ बळी घेतले. त्यामुळे या खेळांमुळे बळी जावू नये याची काळी आपल्यालाच घ्यावी लागेल.