पंतप्रधान शिंजो अॅबे आणि नरेंद्र मोदी यांचा भव्य रोडशो यशस्वी
 महा त भा  13-Sep-2017अहमदाबाद (गुजरात) :  जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे हे आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. दुपारी ३.३० च्यादरम्यान शिंजो अॅबे यांचे भारतात आगमन झाले. यावेळी अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिंजो अॅबे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. शिंजो अॅबे यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत या दोन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. भारत आणि जपानच्या दृष्टीने शिंजो अॅबे यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शिंजो अॅबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आयोजित करण्यात आलेला रोडशो यशस्वी झाला आहे. 

 

Embeded Object

Embeded Objectशिंजो अॅबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहर विविध लोकसंस्कृतीने फुलून गेले आहे. नरेंद्र मोदी आणि शिंजो अॅबे यांच्या रोड शो यशस्वी झाला असून आशियातील दोन प्रमुख देशांच्या प्रमुखांना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. रस्त्यावर विविध संस्कृतीचे दर्शन दोन्ही नेत्यांना घडून आले. शिंजो अॅबे आणि त्यांच्या पत्नी भारतीय वेशात या रोड शोमध्ये दिसल्या.

Embeded Object

Embeded Objectभव्य रोड शो नंतर शिंजो अॅबे आणि त्यांच्या पत्नी साबरमती आश्रम येथे परतल्या आहेत. यानंतर दोन्ही नेता सीदी सैयद मशिदीत जाणार आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कुठल्याही मशिदीत प्रवेश करणार आहेत.
यानंर उद्या शिंजो अॅबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनची पायाभरणी करणार आहेत. ही बुलेटट्रेन डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु होणार असल्याची शक्यता केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केली आहे.