‘इन्क्लुसिव इंडिया समिट’चे काल नवी दिल्ली येथे उद्घाटन
 महा त भा  13-Sep-2017

 

नवी दिल्ली: अपंग नागरिकांसाठी एक सर्वसमावेशी समाजाचे निर्माण करण्यासाठी भारतात ‘सर्वसमावेशी भारत परिषद’ अर्थांत ‘इन्क्लुसिव इंडिया समिट’चे उद्घाटन काल नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात वस्त्रोद्योग आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि अभिनेता विवेक ओबेरॉय उपस्थित होते.

 

 Embeded Object

Embeded Object

 

दिव्यांग नागरिक हे सर्वोत्तम मानव संसाधन आणि सामाजिक व आर्थिक विकासाची संपत्ती आहे असे मत थावरचंद गेहलोत यांनी या परिषदेमध्ये मांडले आहे. प्रशासकीय सेवा परीक्षा-२०१४ मध्ये अव्वल मार्कांनी पास होणारी ईरा सिंघल हिने दिव्यांग मुलांना आणि नागरिकांना या परिषदेमध्ये संबोधित केले.

 

 Embeded Object

Embeded Object

 

भारतीय समाजाला सर्वसमावेशी समाज बनविण्यासाठी समाजातील अपंग व्यक्तींचा सामाजिक कार्यांत समावेश करणे गरजेचे आहे असे मत थावरचंद गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केले आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी ह्या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.