कोरिया सुपर सिरीज स्पर्धा : सिंधू पुढील फेरीत दाखल
 महा त भा  13-Sep-2017


सेऊल, कोरिया : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारातला रौप्य पदक मिळवून देणारी स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ही कोरिया सुपर सिरीज स्पर्धेच्या पुढील फेरीत दाखल झाली आहे. आजच्या सामन्यात सिंधूला हाँगकाँगच्या चेंऊंह निगेनयेई हीच्याशी दोन हात करावे लागले. मात्र सिंधूने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत चेंऊंह निगेनयेई हीला २१-१३ आणि २१-८ अशा फरकाने पराभूत केले.

Embeded Object


या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये सिंधूने आघाडी घेतली होती. दुसऱ्या सेटमध्येही प्रतिस्पर्धी खेळाडूला संधी न देत आघाडी कायम राखत सिंधूने हा सामना जिंकला. सिंधूबरोबरच पारूपल्ली कश्यप, समीर वर्मा आणि पुरूष दुरेही लढतीत सात्विकराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे पुढील फेरीत दाखल झाले आहेत.


सात्विकराज आणि चिराग यांनी तैवानच्या ली मू आणि लीन यू यांचा २१-९, २२-२४ आणि २१-१२ असा पराभव केला. तर समीर वर्मा याने थायलंडच्या एस टनोंगसाक याचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला. पारूपल्ली कश्यप यानेही तैवानच्या स्यू जेन हो याला २१-१३ आणि २१-१६ अशा फरकाने पराभूत केले. तर मनू अत्री आणि सुमिथ रेड्डी यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Embeded Object

Embeded Object