Advertisement
निसर्ग बचावासाठीचा एक आगळ-वेगळा संघर्ष... 
 महा त भा  13-Sep-2017

 

 
मराठी चित्रपट रसिकांना आज अनेक वर्षांनंतरही 'श्वास' या चित्रपटाचे नाव लक्षात असेल पण हा चित्रपट ज्या व्यक्तीने दिग्दर्शित केला होता, त्याच नाव मात्र खूप कमी लोकांना आज आठवेल. संदीप सावंत या हरहुन्नरी कलाकाराने मराठीला 'श्वास'च्या रूपाने एक वेगळाच चित्रपट दिला, या चित्रपटामुळे पुन्हा एकदा मराठीमध्ये नवचैतन्य पसरले. आता हेच संदीप सावंत आपल्यासमोर घेऊन येत आहेत 'नदी वाहते'. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून पुन्हा एकदा सावंत यांनी वेगळ्या विषयाला हात घातल्याचे दिसून येते. 
 
Embeded Object
 
निसर्ग विशेषतः 'अंती' नावाच्या नदीला वाचविण्यासाठीचा एक आगळ-वेगळा संघर्ष या चित्रपटातून बघायला मिळेल अशी आशा आहे. 'नदी' हा सध्याचा खूपच गंभीर विषय आहे आणि सावंत यांनी  त्यावर भाष्य करणारी एक कलाकृती तयार केली आहे. आशा शेलार चांदोरकर, जयंत गाडेकर, हृदयनाथ जाधव असे मोजकेच ओळखीचे चेहरे या चित्रपटात दिसतात बाकीचे बहुतांश कलाकार नवीन आहेत. 
 

 
यात प्रेमकथा दिसेल, यात शहरात झालेलं स्थलांतरण दिसेल पण या चित्रपटाचा मूळ विषय मात्र 'नदी' भोवतीच फिरणारा असेल असा प्राथमिक अंदाज ट्रेलर बघून बांधता येईल. २२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

@@[email protected]@