डबर पिचिंग कामाबाबत महापौरांची नाराजी
 महा त भा  13-Sep-2017
 

 
 
जळगाव :  मेहरुण तलाव सुशोभिकरणांतर्गत सुरु असलेल्या पिचिंग वॉलची पाहणी महापौर ललित कोल्हे व जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्यातर्फे करण्यात आली.  

शिवाजी उद्यान लगतच्या तलावाच्या बांधाला करण्यात आलेल्या डबर पिचिंग वॉल कामासंदर्भात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगान जिल्हाधिकारी तथा आयुक्त व महापौर  ललित कोल्हे यांनी भेट देवून पाहणी केली. या वेळी महापौर यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी कामाच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त केले.

संबंधित मक्तेदारास समक्ष बोलवुन कामाचा दर्जा सुधारण्याबाबत तसेच सदर काम तातडीने करण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच तलावात म्हशी तसेच वाहन धुण्यावर बंदी घालणे आणि याबाबत त्वरीत अंमलबजावणी करणे बाबत संबंधितांना महापौर ललित कोल्हे यांनी आदेश दिले.